प्रादेशिक स्पर्धेत सुवर्णपदक; महाराष्ट्र संघातील सर्वात लहान बॉक्सरचा मान
CISCE राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी मल्हार हांडोरेची महाराष्ट्र संघात निवड

न्यायभूमी
लासलगाव दि.०२ ऑगस्ट प्रतिनिधी कैलास उपाध्ये
लासलगाव येथील योद्धा मिक्स मार्शल आर्ट्स अकॅडमी”मध्ये प्रशिक्षक कोच राम राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणारा तसेच Seventh Day Adventist Higher Secondary School, Lasalgaon येथे इयत्ता सहावीत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी मल्हार विशाल हांडोरे याने पुणे येथे दि. २८ व २९ जुलै २०२६ रोजी झालेल्या CISCE Regional Boxing Championship 2026 स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले.
या उल्लेखनीय यशाच्या बळावर मल्हारची दि. २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जबलपूर (मध्य प्रदेश) येथे होणाऱ्या CISCE National Boxing Championship 2026 स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेत तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असून महाराष्ट्र राज्याच्या संघातील सर्वात लहान बॉक्सर म्हणूनही त्याचा विशेष गौरव होत आहे.
विशेष म्हणजे, Seventh Day Adventist Higher Secondary School, Lasalgaon या शाळेच्या १०६ वर्षांच्या इतिहासात CISCE National Boxing Championship साठी निवड झालेला मल्हार विशाल हांडोरे हा पहिलाच विद्यार्थी ठरला आहे.
त्याच्या या ऐतिहासिक यशामुळे शाळेबरोबरच योद्धा मिक्स मार्शल आर्ट्स अकॅडमी, लासलगाव या संस्थेचाही नावलौकिक राज्यभर उंचावला आहे.
मल्हारच्या या यशामागे त्याचे प्रशिक्षक कोच राम राजेंद्र पवार यांची अथक मेहनत, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीसाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेत मल्हारला कसून प्रशिक्षण दिले असून, त्याच मेहनतीचे फळ म्हणून आज मल्हार राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाला आहे.
मल्हारच्या या यशामुळे लासलगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध क्षेत्रांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राष्ट्रीय स्पर्धेतही तो सुवर्णयश मिळवून महाराष्ट्राचे नाव देशभर उज्ज्वल करेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



