डुबेरे येथील जनता विद्यालयात विज्ञान छंद मंडळाची स्थापना
न्यायभूमी न्यूज
सिन्नर दि 29 जुलै प्रतिनिधी सोमनाथ गिरी
विज्ञानातून सर्व काही शिका प्रत्येक गोष्टी मागील कार्यकारणभाव जाणून घेऊन जिज्ञासूवृत्ती ठेवलीस आपोआपच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो.
विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञानाची कास धरावी.त्यातून संशोधक तयार होतील असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य रंगनाथ उगले यांनी केले.
डुबेरे येथील जनता विद्यालयात विज्ञान छंद मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून उगले बोलत होते.
व्यासपीठावर पर्यवेक्षक उल्हास पवार,पी.आर.करपे,सोमनाथ पगार,सोमनाथ गिरी,प्रयोगशाळा सहाय्यक सरिता कुटे,कचेश्वर शिंदे,सुनिता ढोली,सविता खंडागळे आदी उपस्थित होते.
विज्ञान छंद मंडळाची स्थापना,उद्घाटन व वैज्ञानिक रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
विज्ञान छंद मंडळाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य रंगनाथ उगले,सचिव रेवणनाथ कांगणे तसेच सदस्य म्हणून विद्यालयातील सर्व विज्ञान शिक्षक व विद्यार्थी यांची निवड करण्यात आली. सायली आव्हाड हिने मनोगत व्यक्त केले.
पल्लवी गवळी व दुर्वा जाधव यांनी दुध, मध,हळद,रवा व लाल तिखट मिरची पावडर आदी वस्तूतील भेसळ कशी ओळखयाची याविषयी विविध प्रयोग करून दाखवले व भेसळयुक्त पदार्थांचे आरोग्यावर होणारे परिणाम याविषयी माहिती दिली.

विज्ञान शिक्षक पी.आर.करपे यांनी विविध शास्त्रज्ञांनी लावलेले शोध,शास्त्रज्ञांना शोध लावताना येणाऱ्या अडचणी याविषयी सविस्तर माहिती दिली.
तसेच करपे यांनी विज्ञानातील मूलभूत तत्वे,संबोध समजावून घेऊन त्यांचे सामान्यीकरण करून आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये ते उपयोगात आणता येते हे उदाहरणासह स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विज्ञान छंद मंडळ समितीचे प्रमुख रेवणनाथ कांगणे यांनी विज्ञान छंद मंडळ स्थापन करण्याचा हेतू व उद्देश समजावून दिला.
सूत्रसंचालन विज्ञान विषय समिती प्रमुख डी.ए.रबडे यांनी केले तर आभार मोनाली ढोमसे यांनी मानले.
यावेळी सर्व शिक्षक,शिक्षिका,Structure सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.


