Breaking
महाराष्ट्र

लासलगाव महावितरणचा ‘वर्ल्डकप’ वादाच्या भोवऱ्यात; ऑन-ड्यूटी मॅच खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी ?

​माहिती अधिकारात उघडकीस आला प्रकार; उपस्थिती दाखवून पगारासह सरकारी तिजोरीची फसवणूक झाल्याचा रामविजय शिंदे यांचा आरोप

1 1 6 8 3 7

न्यायभूमी 

​ नाशिक (लासलगाव ) दिनांक ०७ ऑगस्ट

महावितरणच्या लासलगाव उपविभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कारभार सध्या चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ऑन-ड्यूटी असताना उपकेंद्राच्या हद्दीत क्रिकेट मॅचेस खेळून कंपनी आणि शासनाची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

विशेष म्हणजे माहिती अधिकारात याबाबत विचारणा केली असता अशा प्रकारची कोणतीही क्रिकेट मॅच भरवली नसल्याचे लेखी उत्तर देऊन माहिती दडपण्याचा प्रयत्न उपकार्यकारी अभियंत्यांनी केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रामविजय शिंदे यांनी केला आहे.

​काय आहे नेमके प्रकरण?

दिनांक ३ मार्च २०२६ रोजी सारोळा उपकेंद्राच्या परिसरात लासलगाव उपविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकदिवसीय क्रिकेट मॅच पार पडली होती.

याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते.

या क्रीडा स्पर्धेबाबत रामविजय शिंदे यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती मागवली होती.

मात्र, उपकार्यकारी अभियंता,लासलगाव यांनी “अशी कोणतीही क्रिकेट मॅच भरवण्यात आली नव्हती” असे उडवाउडवीचे आणि चुकीचे लेखी उत्तर दिले.

​दुसरीकडे, ३ मार्च रोजीचे हजेरी पत्रक (Attandance Register) तपासले असता सर्व अधिकारी व कर्मचारी कामावर हजर असल्याचे दाखवून त्यांनी पूर्ण पगारही उचलला आहे.

त्यामुळे सर्वजण ऑन-ड्यूटी हजर होते,तर मग सारोळा येथे क्रिकेट मॅच खेळणारे ते अधिकारी-कर्मचारी कोण होते? असा रोकडा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

​वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; कागदी घोडेच नाचवणार का?

ड्यूटीवर असताना बाहेरगावी जाऊन क्रिकेट खेळणे, हजेरी लावून पगार घेणे आणि माहिती अधिकारात खोटी माहिती देऊन पदाचा गैरवापर करणे, या सर्व प्रकारांमुळे लासलगाव उपविभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

या सर्व प्रकरणाची माहिती चांदवड येथील कार्यकारी अभियंता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना असूनही ते डोळेझाक करत आहेत.

उपकार्यकारी अभियंता नेमके कोणाला वाचवण्यासाठी कारवाई टाळत आहेत? ते कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत? असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

​ऊर्जा मंत्र्यांकडे तक्रार करणार: रामविजय शिंदे

“सरकारी तिजोरीची फसवणूक करणाऱ्या, बेशिस्त आणि कामचुकार अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई झाली पाहिजे.

लासलगाव परिसरातील ग्राहकांची आणि शासनाची दिशाभूल करणाऱ्या या प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी.

वरिष्ठ अधिकारी जर कारवाई करणार नसतील, तर या संपूर्ण गैरप्रकाराबाबत लवकरच राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांकडे पुराव्यासह तक्रार दाखल केली जाईल.”

— रामविजय शिंदे (तक्रारदार)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 6 8 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे