Breaking
आरोग्य व शिक्षण

माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव शाळेत संस्थापक अध्यक्ष माणिक रघुनाथ मढवई यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा

न्यायभूमी न्यूज कोटमगाव ज्ञानेश्वर भवर

0 9 5 3 0 3

न्यायभूमी न्यूज 

कोटमगाव दि २७ जून 

 सविस्तर वृत्त असे की,माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव शाळेत संस्थापक यांचा जन्मदिवस विविध स्पर्धानी साजरा करण्यात आला.

   यावेळी सरस्वती माता व मढवई सरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी गावचे माजी उपसरपंच श्री प्रमोद पवार होते.

प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री धनंजय मोरे,श्री प्रतिक मढवई,श्री जितेंद्र कुलकर्णी हे होते.

सूत्रसंचालन श्री गलांडे ए.पी.सर.( जेष्ठ व मराठी विषय तज्ञ) यांनी केले कु ललित गांगुर्डे,कुमारी आदिती शिरसाठ व श्रावणी गायकवाड या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

शिक्षक श्री गांगुर्डे पी के यांनी प्रास्ताविकातून सरांचा शाळा चालविण्यासाठी केलेला संघर्ष व शेवटच्या श्वासापर्यंत केलेला प्रयत्न व्यक्त केला.

मढवई सर आदर्श संस्थापक कसे हे श्री गलांडे सर यांनी सरांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडून समजावून सांगितले.

   श्री प्रमोद पवार,श्री धनंजय मोरे,श्री प्रतिक मढवई यांनी सरांचे जीवनकार्य भावी पिढीला प्रेरणादायी असल्याचे व्यक्त केले  

  मुख्याध्यापिका अनिता मढवई यांनी सरांच्या आयुष्यात अनेक वेळा अपयश आले परंतु हताश न होता पुन्हा नव्याने सुरुवात केली असे अनेक वेळेचे उदाहरण त्यांच्या जीवनातील दिले. 

कु. श्रावणी गायकवाड ह्या विद्यार्थिनीने जगात देव आहे का? हा विषय अतिशय प्रभावी उदा. द्वारे पटवून दिले.

    लालित गांगुर्डे याने सर फक्त दिसत नाही परंतु त्यांचा सहवास आपल्याला जाणवतो आणि संघर्षमय प्रवासात आपली नाव किनारा कशी गाठेल हे सरांकडून शिकावे  

    सरांच्या जन्म दिवसाबद्दल शाळेत दि 24 व 25 तारखेला विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

त्यात कबड्डी,लिंबू चमचा,दोरऊडी, गोळफेक,थाळीफेक,अंतक्षरी,रांगोळी, चित्रकला,निबंध,वक्तृत्व,गायन,चालता बोलता इ.ह्यासाठी सांस्कृतिक विभागप्रमुख श्री गलांडे सर,क्रीडा शिक्षक श्री.गांगुर्डे सर यांनी विशेष भूमिका पार पाडली.

तज्ञ् परीक्षक म्हणून श्री केदारे सर. हिंदी विषय तज्ञ शिक्षक व श्री.कदम जयेश सर. संगणक, व गणित विषय तज्ञ् शिक्षक यांनी निपक्षपाती भूमिका बजावून आपली भूमिका पार पाडली.

स्पर्धेत यशस्वी विध्यार्थ्यांना 26जानेवारी रोजी योग्य पारितोषिक व प्रशसस्तीपत्रक देऊन गौरण्यात येईल.

यशस्वी व विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला 

 यावेळी दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपण करण्यात आले‌

  हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री गलांडे सर,श्री केदारे सर,श्री.गांगुर्डे सर,श्री.कदम सर.श्री दिवटे सर,श्री.देवडे सर शिक्षकेतर कर्मचारी यांनी व विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 3 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे