तालुका विधी सेवा समिती जावळी मार्फत मेढा न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्सवात साजरा
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
सातारा जिल्हा दि २१ जून
मेढा,ता.१४: मा.ना.सर्वोच्च न्यायालय,दिल्ली,मा.ना.उच्च न्यायालय,मुंबई, महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई,आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांचे आदेशान्वये शनिवार (ता.२१/०६/२०२५) रोजी सकाळी ९.०० ते १० वाजेपर्यंत दिवाणी व फौजदारी न्यायालय,मेढा येथे जागतिक योग दिन डॉ.विक्रम.अं.आव्हाड,दिवाणी न्यायाधीश,क.स्तर,तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मेढा यांचे अध्यक्षतेखाली साजरा करणेत आला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमास जावली तालुका वकील संघाचे जेष्ठ विधीज्ञ आर.एस.पोफळे,तसेच विधीज्ञ आरती शेटे,श्रीमती.एन.एस.पवार व सर्व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात मेढा न्यायालयाचे कर्मचारी श्री अप्पा आवटे यांनी योग कसा करावा व योग आसनाचे प्रत्येक्षीत करून उपस्थिता कडून ताडासन,वृक्षासन,डोळ्यांची आसने,चेहऱ्याची आसने,अनुलोम विलोम,व सगळ्यांना हसवणारे हास्यसन करून घेतले.
सगळ्यांना योगाचे महत्व व त्याचा आपल्या शरीरावर होणारे परिणाम या बद्दल माहिती दिली.
तसेच आजच्या धकाधकीच्या जीवनात योग किती महत्वाचा आहे आणि त्यामुळे आपले शरीर व मानसिक आरोग्य कसे चांगले राहील.
योग ही एक साधना असून आपण योग करणे किती गरजेचे आहे या बद्दल डॉ. विक्रम.अं.आव्हाड, दिवाणी न्यायाधीश,क.स्तर,तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मेढा यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जावली वकील संघाचे चे सदस्य व मेढा न्यायालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.



