Breaking
गुन्हेगारी

लासलगाव शहरात स्टेशन रोड परिसरात 2 ठिकाणी घडल्या चोरीच्या घटना 

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 3 8 9 4

न्यायभूमी 

 लासलगाव दि.२५ मे कैलास उपाध्ये

 

Oplus_131072

 लासलगाव शहर हे कांद्याचे मोठी बाजारपेठ असल्याने नेहमीच मोठ्या प्रमाणातवर्दळ असते लासलगाव शहरात अज्ञात चोरट्यांनी अशोक डागा यांच्या अमृता ऑइल कॉर्पोरेशन येथे स्टोर टॅंक मधील खाद्याचे तेल चोरून नेल्याची घटना घडली आहे.

तसेच स्टेशन रोड येथील धाडीवाल जनरल स्टोअर येथे मागील दरवाजा तोडून दुकानात प्रवेश करून दोन ते अडीच लाखाचा सिगारेट चे खोक्यातून मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

धाडीवाल यांच्या सीसीटीव्हीचे डीव्हीआरच चोरट्यानी चोरून नेल्याची ही माहिती अभिजित धाडीवालं यांनी दिली.मागील काही झालेल्या प्रमुख चोरीच्या घटना 

जिल्हा बँक शाखेत चोरीचा प्रयत्न: लासलगावमधील जिल्हा बँक शाखेत चोरट्यांनी शटर आणि कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला होता, मात्र आतील सुरक्षा व्यवस्थेमुळे तो अयशस्वी ठरला.

याआधी याच परिसरात चोरांनी घरांना बाहेरून कड्या लावून घरफोड्या करण्याचे प्रकारही केले आहेत.दत्त मंदिरात चोरी: लासलगाव येथील श्री दत्त मंदिरात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराच्या दानपेटीतील रक्कम आणि देवाच्या अंगावरील तब्बल दीडशे ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट व राजदंड चोरून नेल्याची घटना घडली आहे.

सराफा दुकानात हातचलाखी: लासलगाव येथील एका सराफा दुकानात खरेदीचा बहाणा करून आलेल्या मालेगावच्या चोरट्यांनी हातचलाखीने सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली होती.

शहरात वाढत्या चोऱ्या आणि घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी,अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 3 8 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे