जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,वाद येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
नासिक जिल्हा दि.२८ जानेवारी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाद येथे २६ जानेवारी रोजी ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमास सर्व ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऑपरेशन सिंदूरमध्ये उल्लेखनीय भूमिका बजावणारे गावाचे भूमिपुत्र सेनादलातील जवान श्री.गौरव गोरसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.सुधीर खताळ यांच्या हस्ते ध्वजपूजन संपन्न झाले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेली संगीत कवायत सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व,संविधान मूल्ये व देशप्रेम यावर आधारित विद्यार्थ्यांची प्रभावी भाषणे उपस्थितांना प्रेरणादायी ठरली.

जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे बक्षीस वितरण करून गौरव करण्यात आला.याचप्रसंगी शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री.दिनेश बापू खैरनार यांनी महाराष्ट्र शासनाची TET परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.दिनेश खैरनार सर यांनी केले, तर प्रास्ताविक मा.मुख्याध्यापक श्री.संतोष खरात सर यांनी केले.यावेळी गावाचे सरपंच मा.प्रविण दादा आहेर यांनी उपस्थित राहून आपल्या भाषणात शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता,उपक्रमशीलता व शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करून शाळेच्या पुढील प्रगतीस शुभेच्छा दिल्या.
तसेच मा.मुख्याध्यापक श्री.संतोष खरात सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रेरणादायी व मार्गदर्शक भाषण केले.
संपूर्ण कार्यक्रम राष्ट्रभक्ती,अभिमान आणि प्रेरणेच्या वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.


