न्यायभूमी न्यूूज
विचूर दि ०४ ऑगस्ट अभय पाटील
कोळगाव येथील शेतकरी व देवगाव रस्त्यांच्या रहिवाशानी घेतला उपोषणाचा निर्णय गेली अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला कोळगाव ते देवगाव येथील रस्त्याच्या रहीवाश्यानी सर्व प्रशासन व राजकीय नेते यांचे उंबरठे झिजून सुध्दा ह्या रस्त्याकडे कोणीही दुरुस्ती किंवा साधी विचारना देखील केली नाही.
ग्रामपंचायत व सर्व राजकीय नेते हे दुर्लक्ष करत असल्या मुळे सदर रहीवाशानी अखेर उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

सकाळी ठीक ११ वा देवगाव रस्त्यांचे रहीवासी व महीला ह्या ग्रामपंचायत कार्यालया समोर हजर झाल्या व सर्व प्रथम शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सर्व महिला व बालक हे उपोषणात सहभागी झाले सदर रहीवाशाच्या वर होणाऱ्या अन्यायाला कोळगाव येथील भिम स्टार मित्र मंडळ व आरपी आय निफाड तालुका, तसेच अन्याय अत्याचार निमृलन समिती निफाड,अमोल दादा फाऊंडेशन,हिंदू महादेव कोळी संघटना यांनी ह्या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला.



