सप्तश्रृंगी गड येथे बस स्थानकासाठी ग्रामस्थांचा पाठपुरावा — तहसीलदारांना निवेदन
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
वणी ( सप्तशृंगी गड ) दि.२२ जानेवारी सोमनाथ मानकर
साडेतीन शक्तीपीठा पैकी अर्धपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरती ग्रामस्थांच्या अक्षरशा व्यवसाय नसल्यामुळे बेहाल होत आहे यातून मार्ग काढण्यासाठी आज श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांनी एकत्र येत शिवालय तलाव परिसरात स्थानिक बस स्थानक सुरू व्हावे.
या मागणीसाठी सर्व ग्रामस्थ व आदिवासी समाजाच्या वतीने मा.तहसीलदार श्रीमती,प्रज्ञा डि हिरे कळवण यांना लेखी निवेदन देण्यात आले.
श्री क्षेत्र सप्तश्रृंगी गड येथे सुरू झालेल्या फ्युनिक्युलर रोपवे प्रकल्पामुळे भाविक थेट रोपवेने दर्शनासाठी जात असून,गावामधील रहदारी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
याचा फटका गावातील साडी-ओटी व पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या आदिवासी महिला,छोटे व्यापारी,दुकानदार,हॉटेल चालक तसेच मजुरीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उपजीविकेवर बसत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवालय तलाव परिसरात बस स्थानक सुरू झाल्यास भाविकांची रहदारी गावामधून होईल,रोजगाराच्या संधी निर्माण होतील व ग्रामस्थांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तहसीलदारांनी सदर निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी ग्रामस्थ व आदिवासी समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



