Breaking
राजकिय

तालुकास्तरीय भव्य शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 2 0 9 7

न्यायभूमी 

निफाड दि.०४ डिसेंबर देवीदास निकम

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम स्कॉलरशिप एक्झाम 2025 -पुढारी पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड अँड निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणार असून या तालुकास्तरीय भव्य शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन निफाड येथील वैनतेय विद्यालयामध्ये करण्यात आलेले आहे.

या परीक्षेत प्रथम पाच क्रमांक काढले जाणार असून अनुक्रमे 51000,41000,35000,25000, 21000 हजार अशी बक्षिसे स्कॉलरशिपच्या स्वरूपात देण्यात येणार आहेत.

तसेच लकी ड्रॉ ची सहा बक्षीसे उपस्थित विद्यार्थ्यांमधून दिली जाणार आहेत.या परीक्षेत सुमारे 40 शाळेमधील विद्यार्थी सहभागी होतात.ही परीक्षा दिनांक 7 डिसेंबर 2025 रविवार रोजी होणार आहे.

या परीक्षेचे हॉल तिकीट सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत दिले जाईल त्यानंतर परीक्षा 11 ते 1 वाजेपर्यंत असेल विशेष म्हणजे या परीक्षेचा सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट त्याच दिवशी जाहीर करून गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केला जातो.

या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय परीक्षेसाठी निवड होते.ही परीक्षा दिनांक 28 डिसेंबर रविवार रोजी पिंपळगाव बसवंत येथे आयोजित केलेली आहे.

1.2/5 - (5 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे