Breaking
महाराष्ट्र

{अण्णा }कांदे यांच्याकडून पत्रकारांचा सन्मान

1 3 4 0 9 8

न्यायभूमी 

 विंचूर दिनांक  ०८ नोव्हेंबर मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर 

 दिवाळी सणाचे औचित्य साधून आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने विंचूर येथील पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकारांना शाल,श्रीफळ, भेटवस्तू व दिवाळीची मिठाई देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

हा सन्मान सोहळा विंचूर येथील हॉटेल वेदांत येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या कामाची दखल घेत दिवाळीनिमित्त त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी दत्तात्रेय दरेकर, राजेश भडांगे,सुनील क्षीरसागर,महेश साळुंके, मच्छिंद्र साळुंके,जनार्दन चव्हाण,अभय पाटील,संदीप धनवटे व रोहन सरोदे या पत्रकारांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू व मिठाई देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी संदीप नागरे, सागर वाघ, सोमनाथ निकम, विलास पानसरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

दिवाळीच्या आनंदात पत्रकारांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम यावेळी पार पडला या सन्मान सोहळ्यामुळे उपस्थित पत्रकारांनी समाधान व्यक्त केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 4 0 9 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे