Breaking
महाराष्ट्र

विंचूरमध्ये ‘माणुसकीची भिंत’उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

गरजूंना आधार देत समाजातील माणुसकीचा सुगंध पसरविण्याचा उपक्रम

0 8 9 9 8 8

न्यायभूमी 

विंचूर दि.१२ ऑक्टोंबर दत्तात्रय दरेकर 

समस्त विंचूरकर ग्रामस्थांच्या सहकार्याने ‘माणुसकी फाऊंडेशन, विंचूर’ तर्फे “माणुसकीची भिंत” हा उपक्रम १२ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे.

“नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा” या सुंदर संदेशातून समाजातील परस्पर मदतीची भावना दृढ करण्याचा हा प्रयत्न आहे.

या उपक्रमाअंतर्गत विंचूर बसस्थानकाजवळ, निफाड रोड येथे कपडे,ब्लॅंकेट्स,शालेय उपयोगी वस्तू,सायकल,खेळणी इत्यादी उपयुक्त वस्तू गोळा करून गरजूंना देण्यात येत आहेत.

“चला,गरजूंंची दिवाळी गोड करूया” हा या उपक्रमामागील हेतू आहे.

माणुसकी फाऊंडेशनचे कार्यकर्ते,स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिक मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभागी होत आहेत.

अनेकांनी स्वेच्छेने जुने पण वापरण्यास योग्य कपडे,पुस्तके,चप्पल,व दैनंदिन गरजेच्या वस्तू भिंतीवर ठेवून दिल्या आहेत.

तसेच काही व्यापाऱ्यांनी नवीन वस्तू दान करून या सामाजिक कार्यात हातभार लावला आहे.

या उपक्रमासाठी प्रमुख संयोजक म्हणून राजू मोरे (मो.9960416002),

विनोद शिरसाठ (मो.9850424541),

विकी काळे (मो.8928654257)

किरण शिरसाठ(मो. 8657121912),

आणि विनायक मोरे (मो. 8208686252) हे कार्यरत आहेत.

संपर्क समितीमध्ये पांडुरंग राऊत, डॉ. शैलेश काळे,राहुल कर्पे,सुफियान शेख, प्रितम निकाळे,दिलीप सोनवणे,संजय जाधव,निलेश सालकाडे,किशोर नेवगे,हर्षल जाधव,शंकरलाल सोनी,इम्रान मोमिन,मनोज शिरसाठ यांसह अनेक समाजसेवकांचे योगदान आहे.

माणुसकी फाऊंडेशन, विंचूर यांचा हा उपक्रम दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक आदर्श सामाजिक चळवळ ठरत असून “देताना आनंद, घेताना सन्मान” हा मानवतेचा संदेश प्रत्येक विंचूरकरापर्यंत पोहोचवत आहे.

 याचे ठिकाण विंचूर बसस्थानकाजवळ,निफाड रोड,विंचूर,ता.निफाड

कालावधी: १२ ते १७ ऑक्टोबर २०२५ एवढा आहे.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे