न्यायभूमी न्यूज
मेढा दि.१३ ऑगस्ट
मा.ना.सर्वोच्च न्यायालय, दिल्ली, मा. ना. उच्च न्यायालय,मुंबई, महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई, आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सातारा यांचे आदेशान्वये मंगळवार (ता.१२) रोजी दुपारी ०२.०० ते २.४५ वाजेपर्यंत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा यांचे आदेशान्वये तालुका विधिसेवा समिती जावली तालुका वकील संघ मेढा यांच्या संयुक्त विद्यमाने आज माननीय नामदार सर्वोच्च न्यायालयाने सत्येंद्र कुमार अँटीला वि केंद्रीय अन्वेषण विभाग या न्याय निवाड्यात दिलेल्या मार्गदर्शक तत्वाबाबत कायदे विषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
त्याप्रसंगी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष डॉ.विक्रम आव्हाड,विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्त नूतन बाबर,जावली तालुका वकील संघाचे अध्यक्ष विधिज्ञ आर.एस.पोफळे,ज्येष्ठ वकीलवर्ग एस.एस.मर्ढेकर,एम.एस.माने, विधाते,एस.एल.गोळे,लकडे,शिर्के,पारंगे,पी. डी.गोरे,ए.एस.शेटे,पवार,मेढा पोलिस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक पाटील,सहा.पोलिस निरीक्षक श्रीमती अश्विनी पाटील व मेढा पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी विशेष सहा.सरकारी अभियोक्त नूतन बाबर यांनी पोलिसांना त्यांच्या असणाऱ्या कामातील अडचणीन बाबत सखोल असे कायदेविषयक मार्गदर्शन केले.

या शिबिराचे अध्यक्ष डॉ.विक्रम आव्हाड यांनी सत्येंद्र कुमार अँटी ला व केंद्रीय अन्वेषण विभाग या न्याय निवड्यातील दिलेल्या मार्गदर्शक तत्वांन बाबत सखोल असे मार्गदर्शन करून त्यातील सर्व बाबी काळजी पूर्वक समजावून सांगितल्या.
तसेच त्या न्याय निवड्यातील मार्गदर्शक तत्त्वान ची अंमलबजावणी कशी केली पाहिजे किंवा ती अंमलबजावणी करताना कश्या पद्धतीने कार्यवाही केली पाहिजे या विषयावर कायदेशीर मार्गदर्शन केले.
तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या येणाऱ्या प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे देखील दिली.
त्या वेळी तेथे न्यायालयाचे कर्मचारी संदीप मोरे, अवधूत कुलकर्णी,प्रशांत लिंगडे,महेश पवार, मनोज कांबळे,विजय कदम,बाबा बढेकर,आप्पा आवटे,काजल ओंबळे,केंजळे हे उपस्थित होते.



