विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात ढोल ताशांचा गजरात नवगतांचे स्वागत
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि १७ जून मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील नवीन विद्यार्थांचे मोठ्या उत्साह स्वागत करण्यात आले.
यावेळी ढोल, ताशा व लेझिमाच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
तसेच मोफत पाठ्यपुस्तके व उपयोगी शैक्षणिक साहित्याचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य देवढे एन ई यांनी मागील शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रम, स्पर्धा परीक्षा,इ 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षा याविषयी मार्गदर्शन केले व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले . नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ काका दरेकर, सोमनाथ निकम, राजाभाऊ गोरे,नानाभाऊ गाडे, मालती ताई जाधव,वाघ ताई,चौधरी,बागवान ,विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सुरेश वाबळे, पर्यवेक्षक सुदामराव माळी,सर्व विद्यार्थी,शिक्षक, पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी नागरिक,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक संस्थेचे लाईफ मेंबर चांदे आर के यांनी केले तर विद्यालयातील विज्ञान विषय शिक्षक शेख एम आय यांनी आभार मानले.


