घोटी जनता विद्यालयात क्रांती दिन व आदिवासी दिन उत्साहात साजरा
सिन्नर प्रतिनिधी (सोमनाथ गिरी )

न्यायभूमी दि.०९ ऑगस्ट
घोटी येथील जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष मनोज जाधव होते.
याप्रसंगी व्यासपीठावर उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष राजेंद्र जाधव,शालेय समिती सदस्य गोरख गव्हाणे, अलकाताई जाधव,दीपाताई कुंदकुरीवार, विद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पगारे,चारुशीला तागडे आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले.
यावेळी बोलताना विद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पगारे म्हणाले की, या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा, देशभक्तीची भावना तसेच आदिवासी समाजाच्या संस्कृती,परंपरा आणि योगदानाची जाणीव निर्माण होते.तसेच विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम,सामाजिक बांधिलकी आणि ऐतिहासिक जाणीव निर्माण होण्यास मदत होते.
सूत्रसंचालन सोमनाथ गिरी यांनी केले तर आभार गायत्री सूर्यवंशी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक सहकार्य लाभले.


