जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,वाद येथे ‘बाल आनंद मेळावा’ व ‘आठवडी बाजार’उत्साहात संपन्न
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
चादवड दि.१८ जानेवारी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,वाद येथे विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेला चालना देणारा बाल आनंद मेळावा व आठवडी बाजार हा अभिनव उपक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या उपक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचे आकर्षक सादरीकरण व विक्री करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमास गावाचे मा.सरपंच,शालेय व्यवस्थापन समितीचे मा.अध्यक्ष,मा.पोलीस पाटील,पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.याशिवाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,वराडी येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
मेळाव्यात विद्यार्थ्यांनी भेळपुरी, मेदूवडा,वडापाव,इडली-सांबर, चहा,बासुंदी आदी पदार्थांची विक्री केली.
विशेष बाब म्हणजे सरपंच मा.प्रविणदादा आहेर व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.खंडू गोरसे यांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांसाठी विविध खाद्यपदार्थ खरेदी करून दिले, त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद आणि उत्साह अधिकच वाढला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान,नेतृत्वगुण,आत्मविश्वास तसेच स्वयंरोजगाराचे प्राथमिक धडे मिळाले.
उपस्थित मान्यवरांनी अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक करत शाळेच्या शैक्षणिक व उपक्रमशील कार्यपद्धतीचे विशेष अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक,शिक्षकवृंद,शालेय व्यवस्थापन समिती व सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


