Breaking
महाराष्ट्र

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या आदेशाने वीज ग्राहकांच्या न्यायासाठी शिवसेनेचा जन आक्रोश!

महावितरणच्या अधिकाऱ्यांची अरेरावी? पत्रकारांनाही पोलीस कारवाईची धमकी दिल्याचा आरोप!

1 3 7 7 7 1

न्यायभूमी 

मनमाड दिनांक १६ नोव्हेंबर

वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरून मनमाड शहरात शिवसेना आक्रमक झाली असून, सर्वसामान्य वीजग्राहकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शिवसेनेने एल्गार पुकारला आहे.

महावितरणकडून ग्राहकांना कथितरीत्या वाढीव वीजबिले दिली जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाढीव वीजबिलांबाबत जाब विचारण्यासाठी पुढे येणाऱ्या ग्राहकांशी महावितरणच्या काही अधिकाऱ्यांकडून अरेरावी केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

इतकेच नव्हे, तर या प्रकरणाची माहिती घेणाऱ्या पत्रकारांनाही पोलीस केस करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने या प्रकरणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या आदेशाने शिवसेनेने जनतेच्या हक्कांसाठी आक्रमक भूमिका घेतली असून, वाढीव वीजबिलांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महावितरण प्रशासनाला जाब विचारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 

वीजग्राहकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, नागरिकांच्या तक्रारींचे योग्य निराकरण व्हावे आणि अधिकाऱ्यांनी ग्राहकांशी सन्मानपूर्वक वागावे, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

 

वाढीव वीजबिलांचा प्रश्न, अधिकाऱ्यांची कथित अरेरावी आणि पत्रकारांना दिलेल्या धमक्यांच्या आरोपांवर महावितरण प्रशासनाने अधिकृत खुलासा करावा,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जनतेच्या वीजप्रश्नांवर शिवसेनेचा हा एल्गार आता कोणते वळण घेणार? महावितरण प्रशासन यावर काय भूमिका घेणार, याकडे मनमाडकरांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 7 7 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे