निफाड तालुक्यातील सुभाषनगर येथील स्वातंत्र्यानंतर प्रथमच धावणार लालपरी…
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि १७ जुलै मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
निफाड तालुक्यातील सुभाषनगर येथील विद्यार्थी शिक्षणासाठी गावापासून 5 किमी दूर असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथे पायी पायपीट करत होते.

त्यामुळे सदर विद्यार्थ्यांची समस्या दूर करण्यासाठी विद्यालयाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले गेले.त्याचे फलित म्हणून लासलगाव एसटी डेपोच्या व्यवस्थापिका काळे मॅडम यांच्या सहकार्यातून स्वातंत्र्यानंतर प्रथमच सुभाषनगर येथे एसटी महामंडळाने बस फेरी मंगळवार दि. 15 जुलै 2025 रोजी सुरू केली.
त्यामुळे विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार आहे. त्याप्रसंगी सुभाषनगर गावाचे सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य,विविध पदाधिकारी,ग्रामस्थ व विद्यार्थी बसच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

बस फेरी सुरू झाल्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी,सदस्य,स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती,शाळा व्यवस्थापन व विकास समिती,पालक शिक्षक संघ,माता पालक संघाचे सर्व कार्यकारिणी सदस्य,ग्रामस्थ,प्राचार्य, उपप्राचार्य,पर्यवेक्षक,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी महामंडळाचे आभार व्यक्त केले.

