तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत जनता विद्यालय डुबेरे तृतीय
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
सिन्नर दि २५ ऑगस्ट प्रतिनिधी:- पंचायत समिती शिक्षण विभाग व तालुका विज्ञान – गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चालू शैक्षणिक वर्षाचा विज्ञान नाट्य महोत्सव होरायझन ॲकॅडमि सिन्नर येथे आयोजित करण्यात आला होता.
या नाट्यमहोत्सवात डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले .या नाट्यमहोत्सवात एकूण दहा शाळांनी सहभाग घेतला होता. कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर नाटिका सादर करण्यात आली होती.
विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक रामदास वाजे यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक यांचा सत्कार करण्यात आला.
शितल वारुंगसे,आरोही जाधव, पल्लवी गवळी,गौरी वाजे,ईश्वर पडवळ,साई बिन्नर, भूषण वाघ,सार्थक वारुंगसे,आर्यन पावसे,सार्थक ढोली या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना भारती निखाडे,सिद्दी आहेर,पी.आर.करपे,सोमनाथ पगार,डी. ए.रबडे,रेवणनाथ कांगणे,सुनिल ससाणे ,निवृत्ती बर्गे आदींचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयाच्या या यशाबद्दल संचालक कृष्णाजी भगत , शालेय समिती अध्यक्ष नारायणशेठ वाजे,उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष विठ्ठल वामने,पालक- शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ वारुंगसे ,संस्था शिक्षणाधिकारी डॉ. भास्करराव ढोके , गटशिक्षणाधिकारी श्री राजेश डामसे ,शिक्षणविस्तार अधिकारी कैलास सांगळे,केंद्रप्रमुख विजय निरगुडे,मुख्याध्यापक रामदास वाजे, जेष्ठ शिक्षक दिगंबर जाधव,सोमनाथ गिरी,कचेश्वर शिंदे,अरुण डावरे,वरिष्ठ लिपिक राणी शिंदे,रोहिणी भगत आदींसह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी केले आहे.


