Breaking
आरोग्य व शिक्षण

नूतन विद्यालय खडक माळेगाव येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 5 3 0 3

न्यायभूमी न्यूज 

 खडक माळेगाव दि ०८ मार्च अभय पाटील 

खडक माळेगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी जागतिक महिला दिन साजरा केला.

याप्रसंगी विद्यार्थिनींनी विविध यशस्वी महिलांच्या वेशभूषा केल्या. विद्यार्थिनींनी महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या जीवनावर विविध कविता,भाषणे सादर केले. इयत्ता नववी ब च्या विद्यार्थिनींनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते.

याप्रसंगी विद्यार्थिनींनी सर्व शिक्षक-शिक्षिका यांचे पुष्प व पेन देऊन सत्कार केला.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ रायते एम. बी. या होत्या. कार्यक्रमात विद्यालयाच्या शिक्षिका श्रीम. शिर्के एस. एस., श्रीम. दुधारे के. व्ही. , श्रीम. शिंदे डी. एम. यांनी मनोगत व्यक्त केले.

मुख्याध्यापिका सौ रायते एम. बी. यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी सेजल गारे आणि जयश्री शिंदे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 3 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे