Breaking
महाराष्ट्र

लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयातील एनसीसी विद्यार्थ्याची राष्ट्रीय कॅम्पसाठी निवड

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 8 8

न्यायभूमी 

नासिक ( खेडलेझुंगे ) दि.०६ नोव्हेंबर : बाबा गिते

लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित लोकनेते दत्ताजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या विद्यालयातील एनसीसी विभागातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील ऑल इंडिया रॉक क्लाइंबिंग ट्रेनिंग कॅम्प या शिबिरासाठी निवड झाली आहे.

दिनांक ८ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरासाठी विद्यालयातील कॅडेट प्रदीप कैलास कुटे यांची निवड सेव्हन महाराष्ट्र बटालियन एनसीसी,नाशिक मधून झाली आहे. 

सदर कॅम्पमध्ये देशभरातील विविध राज्यांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

या यशाबद्दल सेव्हन महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे कमांडिंग ऑफिसर एम.एस.केरूला आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर तनिष्क गौर,तसेच संस्थेच्या संचालिका नीताताई पाटील, विद्यालयाचे प्राचार्य विजय वाणी,क्रिडा शिक्षक व एनसीसी ऑफिसर प्रमोद पवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

या यशस्वी निवडीबद्दल लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील,उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, संचालिका नीताताई पाटील,पुष्पाताई दरेकर, संचालक शंतनू पाटील,अभय पाटील,सिताराम जगताप,लक्ष्मण मापारी,कैलास ठोंबरे, विद्यालयाचे प्राचार्य विजय वाणी,सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कॅडेट प्रदीप कुटे यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.

याप्रसंगी विद्यालयात विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.या यशामागे विद्यालयाचे एनसीसी विभाग प्रमुख प्रमोद पवार व क्रीडा शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

1/5 - (2 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे