लोहोणेर जनता विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरी
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
नासिक :- दि ३० जानेवारी विशेष प्रतिनिधी मिनाताई शेटे
लोहोणेर-:येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर .एच देसले हे होते तर शिक्षक वृंद व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.शेवाळे ए .टी यांनी महात्मा गांधीनी केलेल्या कार्याची व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधीजींच्या योगदानाची माहिती आपल्या भाषणातून करून दिली.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री शेवाळे ए.टी यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले.


