सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त लासलगाव पोलीस ठाण्याच्यावतीने “एकता दौड” चे आयोजन
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
लासलगाव दि.३० ऑक्टोंबर बाबा गिते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त लासलगाव पोलीस ठाण्याच्यावतीने दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता “एकता दौड” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या एकता दौडीची सुरुवात लासलगाव पोलीस ठाण्यातून होऊन स्वामी रिसॉर्ट येथे सांगता होणार आहे.
या पार्श्वभूमीवर दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.00 वाजता लासलगाव पोलीस ठाण्यात नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठक लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीस डॉक्टर असोसिएशन,स्वीमिंग ग्रुप, सायकलिंग ग्रुप,पत्रकार,ग्रामपंचायत,कृषी उत्पन्न बाजार समिती,व्यापारी वर्ग,तसेच विविध शासकीय संस्था,कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी आणि सामाजिक व धार्मिक मंडळांचे सदस्य उपस्थित होते.
या वेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भास्करराव शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले की, “राष्ट्रीय एकता आणि ऐक्याचा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी या एकता दौडीत सहभागी व्हावे.”
तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस विभागासह सर्व सामाजिक संस्था आणि नागरिकांनी सहकार्य करावे,असेही त्यांनी आवाहन केले.



