श्रीरामपूर: श्री विठ्ठल नामदेव महाराज मंदिर प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न
ह.भ.प. भारत महाराज जाधव यांच्या हस्ते व आ. हेमंत ओगले यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखदार सोहळा

न्यायभूमी
दिनांक. १७ नोव्हेंबर
विंचूर (नाशिक) सुनील क्षिरसागर
श्रीरामपूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय हेमंत ओगले यांच्या विकास निधीतून साकारण्यात आलेल्या ‘श्री विठ्ठल नामदेव महाराज मंदिर प्रवेशद्वाराचा’ लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात, भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात पार पडला. श्री संत रामदास महाराज कैकाडी मठाचे मठाधिपती तथा श्री क्षेत्र पंढरपूर येथील ह.भ.प. भारत महाराज जाधव यांच्या शुभहस्ते फित कापून व फटाक्यांच्या जोरदार आतिषबाजीमध्ये या प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले.
*मान्यवरांचा सत्कार व उपस्थितांची गर्दी*
नामदेव शिंपी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष कैलास खंदारे यांच्या हस्ते ह.भ.प. भारत महाराज जाधव, आमदार माननीय हेमंत ओगले, नगराध्यक्ष करणदादा ससाणे तसेच उपस्थित इतर प्रमुख मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. दीपावलीच्या उत्तरार्धात आनंददायी ठरलेल्या या क्षणाचा अनुभव घेण्यासाठी शेकडो भाविक, वारकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*संत नामदेव महाराजांच्या विचारांचे प्रबोधन*
या प्रसंगी बोलताना प्रमुख अतिथी ह.भ.प. भारत महाराज जाधव यांनी आपल्या अमृतवाणीतून संत नामदेव महाराजांचे विचार साध्या, सरळ व सोप्या भाषेत उपस्थित भाविकांना समजावून सांगितले. “देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी” या संत विचारांची महती त्यांनी उपस्थितांना पटवून देत उपस्थितांची मने जिंकली.
*संविधान दिनानिमित्त रायगडावर उपस्थित राहण्याचे आवाहन*
कार्यक्रमादरम्यान महत्त्वाचे आवाहन करताना भारत महाराज जाधव म्हणाले की, शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने आगामी २५ व २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. वारकरी, शेतकरी, आदिवासी आणि सर्व समाजबांधवांनी या ऐतिहासिक अभिवादन सोहळ्यासाठी रायगडावर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
*प्रमुख मान्यवरांची उपस्थिती*
या लोकार्पण सोहळ्याला आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करणदादा ससाणे, शिर्डी संस्थांचे विश्वस्त तथा काँग्रेस कमिटीचे सचिन गुजर, नगरसेविका निलोफर शेख, नगरसेवक दिलीप नागरे, सामाजिक कार्यकर्ते लकी सेठी, अण्णासाहेब डावखर, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे जिल्हाध्यक्ष अशोकराव दिवे, राज्यसचिव डॉ. जालिंदर घिगे, राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. सलीम शेख, शाहीर भीमराव कदम, ॲड. अमोल सोनवणे, ॲड. कुमार भिंगारे, संतोष त्रिभुवन, विजय जगताप, रामदास आढाव, भारत शिंगारे, भगवान खरात, सतीश लोंढे, इकबाल काकर, कवी रज्जाकभाई शेख, राजू शेख उपस्थित होते.
तसेच शिंपी समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक नामदेव भिसे, संगमनेर शिंपी समाज अध्यक्ष राजाभाऊ अवसक, राजु लचके, सचिन सारंगधर, किरण भांबरे, हेमंत सारंगधर, हेमंत गुजर, शाम सारंगधर, राहुल नेवासकर, तुषार नेवासकर, श्रीधर गायकवाड, राजू भांबरे, वासुदेव भांबरे, दत्तात्रय भांबरे, तेजस गायकवाड, मुकुंदराव देव्हारे, गोविंद देव्हारे आदी समाजबांधव उपस्थित होते. अध्यात्म महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सुमन काकू नेवासकर, सौ. भावना नेवासकर, राष्ट्रसेवा दलाच्या श्रीमती नम्रता पवार यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनींनीही या सोहळ्यात सहभाग घेतला.
*सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रास्ताविक:*
श्री संत नामदेव शिंपी समाज पंच मंडळाचे प्रमुख पंच तथा अध्यक्ष कैलास खंदारे.
*सूत्रसंचालन:* विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे जिल्हाध्यक्ष अशोकराव दिवे.
आभार प्रदर्शन: किरण भांबरे.




