Breaking
आरोग्य व शिक्षण

एस.एन.डी.इंग्लिश मीडियम स्कूल व ज्यु.कॉलेज बाभुळगाव येथे हुतात्मा दिन व महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 8 5

न्यायभूमी 

येवला दि.३१ जानेवारी २०२६ पुष्पा पाटील

 जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित एस.एन.डी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्यु. कॉलेज बाभुळगाव येथे हुतात्मा दिनाचे औचित्य साधत 30 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अत्यंत भावपूर्ण वातावरणात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी व एकतेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देत महात्मा गांधी यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी दोन मिनिटांचे मौन पाळले.

यावेळी संपूर्ण शाळा परिसर शांततेने न्हाऊन निघाला होता.त्यानंतर प्रार्थना व देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले.

यावेळी प्राचार्य श्री शिंदे सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महात्मा गांधी यांच्या सत्य,अहिंसा,शांती,स्वावलंबन आणि सामाजिक समतेच्या विचारांवर सखोल प्रकाश टाकला. आजच्या काळात गांधीजींचे विचार अधिकच महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्शांनुसार जीवन जगावे,असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या जीवनकार्यावर भाषणे सादर केली.काही विद्यार्थ्यांनी गांधी विचारांवर आधारित मनोगत, घोषवाक्ये तसेच देशभक्तीपर कविता सादर करून उपस्थितांना भावूक केले.

हुतात्मा दिनाचे ऐतिहासिक महत्त्व सांगताना देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व वीरांना कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले.

याप्रसंगी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकता, सामाजिक जबाबदारी व शांततामय सहअस्तित्वाचे महत्त्व समजावून सांगितले.

कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत झाली असून नैतिक मूल्यांची रुजवणूक झाल्याचे चित्र दिसून आले.

सदर कार्यक्रमास प्राचार्य श्री.शिंदे सर उपप्राचार्य श्री.पाटील सर तसेच श्री.बंड सर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हुतात्मा दिनानिमित्त साजरा झालेल्या या उपक्रमामुळे शाळेच्या शैक्षणिक व संस्कारक्षमतेला नवा आयाम मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे