Breaking
आरोग्य व शिक्षण

एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालयात “वाचन प्रेरणा दिन”मोठ्या उत्साहात साजरा

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 5 3 0 3

न्यायभूमी

येवला दि.१५ ऑक्टोंबर पुष्पा पाटील 

बाभुळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी जे.अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यातआला.

यावेळी प्राचार्य डॉ डी.एम यादव यांच्या हस्ते अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

तसेच प्राचार्य डॉ यादव म्हणाले कि डॉ अब्दुल कलाम यांच्यासारख्या महान व्यक्तीचे विचार जागृत राहण्यासाठी त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी वाचन हाच एकमेव उत्तम पर्याय आहे.वाचनानेच माणूस घडतो त्याला दिशा मिळते.

या कार्यक्रमासाठी ग्रंथपाल जे.पी नागरे.आणि ए.डी दामले.यांनी प्रेरणादायी पुस्तकांचे प्रदर्शन भरवले.

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच सर्व विभाग प्रमुख डॉ.रोकडे. डॉ.फरीद अहमद,डॉ.पवार,डॉ.राणे.डॉ.बोंबले, डॉ.निकम,प्रा.डाके,डॉ.अन्सारी,प्रा,साठे,प्रा.समुद्रे अधिष्ठाता प्रा.येवले व डॉ भाने उपस्थित होते.प्रा.सावंत यांनी सर्वांचे आभार मानले.

2/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 3 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे