उत्साहात पंढरपुरात; पर्यावरण संवर्धन,इंधन बचत आणि निरोगी जीवनशैलीचा दिला संदेश
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
नाशिक जिल्हा दि.१७ जुलै कैलास उपाध्ये
भक्ती, फिटनेस आणि समाजसेवेचा सुंदर संगम घडवत निफाड सायकलिस्टची ४० सदस्यांची सायकल वारी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात दाखल झाली.
विठ्ठल दर्शनासोबतच सर्व ४० वारकऱ्यांनी अवयवदानाचा संकल्प करून पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि आरोग्य संवर्धनाचा संदेश देत वारीला सामाजिक बांधिलकीची अनोखी किनार दिली.
दिनांक १० जुलै रोजी निफाड येथून प्रारंभ झालेली ही सायकल वारी अवघ्या दोनच दिवसात पंढरपूर येथे शहर फेरी,नगर प्रदक्षिणा, रिंगण सोहळा आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन संपन्न झाली.
या संपूर्ण प्रवासात ‘अवयवदान करा, झाडे लावा-झाडे जगवा,सायकल चालवा-इंधन वाचवा आणि सायकल चालवा-आरोग्य राखा’ असा सामाजिक संदेश देण्यात आला.
वारीतील रिंगण सोहळा हा सहभागींसाठी अविस्मरणीय ठरला.महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून सुमारे चार हजार सायकलस्वार या सोहळ्यात सहभागी झाले होते.
प्रत्येक क्लबची वेगळी ओळख, वेगवेगळ्या रंगांच्या जर्सी आणि प्रत्येक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व असले तरी सर्वांच्या मनात ‘विठ्ठल नाम आणि सायकल प्रेम’ हीच एक भावना होती.
यंदाच्या वारीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अवयवदान जनजागृती.निफाड सायकलिस्टच्या सर्व ४० वारकऱ्यांनी अवयवदानाचा संकल्प करून समाजात सकारात्मक संदेश दिला. त्यामुळे भक्तीबरोबरच समाजप्रबोधनाचे कार्यही घडल्याचे समाधान सहभागी सदस्यांनी व्यक्त केले.
या सायकल वारीत निफाड सायकलिस्टचे प्रणेते प्रवीण तनपुरे,अध्यक्ष पांडुरंग कडवे,उपाध्यक्ष अशोक कोल्हे,पंढरपूर वारी प्रमुख संदीप गवळी, सचिव दीपक घंगाळे,राजेंद्र गवळे,तसेच रणरागिणी डॉ.सीमा डेरले,पूजा मगर,मनीषा वाघ, साक्षी तांबे यांच्यासह वैभव ताकटे,ओंकार घंगाळे,ॲड.रामनाथ शिंदे,आकाश दौंड,संतोष काजळे,शहाजी चोपडे आणि अन्य सदस्य सहभागी झाले होते.


