घोटी येथील जनता विद्यालयात डॉ.आंबेडकर यांना अभिवादन
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
सिन्नर दि.१६ एप्रिल सोमनाथ गिरी

घोटी येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य नितीन भामरे होते.
व्यासपीठावर उपमुख्याध्यापक उल्हास पवार ,पर्यवेक्षक हिरामण चौधरी,ज्येष्ठ शिक्षक निवृत्ती सरगर,चारुशिला तगडे,अपर्णा उईके,हेमंत झोले,संपत शेंगाळ,तृप्ती थोरात आदी उपस्थित होते.
उपस्थितींच्या हस्ते डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
डॉ.आंबेडकर यांच्या जीवन व कार्याचा परिचय उपशिक्षक रमेश देवगिरे,सोनाली वाघ यांनी करून दिला.
यावेळी बोलतांना विद्यालयाचे प्राचार्य नितीन भामरे म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी आयुष्यभर कार्य केले.
भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी त्यांनी अविरत परिश्रम घेतले म्हणून त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते.
जातीयभेद,सामाजिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न केले.डॉ आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे म्हणून डॉ.आंबेडकर यांचा कार्याचा आदर्श यावा असे आव्हान प्राचार्य भामरे यांनी शेवटी केले.

सूत्रसंचालन रमेश देवगिरे यांनी तर आभार गायत्री सूर्यवंशी यांनी मानले.यावेळी सोमनाथ गिरी,कैलास पाचोरे,सुधीर काळे,सत्येन जाधव, रुपाली चौधरी,मनिषा सोनवणे,अलका राठोड, प्रकाश तांबे,मंगेश कासार वरिष्ठ लिपिक जीवन शिंदे,अनिल गोवर्धने आदींसह शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


