Breaking
कृषीवार्ता

दुष्काळाने शेती उद्ध्वस्त आता बिबट्यांच्या दहशतीने शेतात जाणेही कठीण

तळवाडे-गवंडगाव शिवारात एकाच वेळी तीन बिबट्यांचे दर्शन मका सोंगणी करणाऱ्या मजुरांमध्ये घबराट वन विभागाकडून पिंजरा लावून बंदोबस्त

1 3 4 6 7 0

न्यायभूमी 

येवला दिनांक ०९ नोव्हेंबर प्रतिनिधी : एकनाथ भालेराव

येवला तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या संकटांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे हाताला काम नाही शेतात उत्पन्न नाही आणि जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे अशातच आता बिबट्यांच्या वाढत्या वावराने शेतकरी आणि शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तळवाडे गवंडगाव शिवारात एकाच वेळी तब्बल तीन बिबट्यांचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे

 

तळवाडे गवंडगाव शिवारातील पुंजाहरी कारभारी भागवत व नारायण रखमा भागवत यांच्या शेत परिसरात मका पिकाची सोंगणी सुरू असताना शेतमजुरांना एकाच वेळी तीन बिबटे दिसले अचानक झालेल्या या दर्शनाने मजुरांची एकच धावपळ उडाली या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बिबट्यांचे चित्रीकरण केले त्यामुळे या परिसरातील बिबट्यांचा वावर अधोरेखित झाला आहे

दुष्काळाच्या जखमेवर बिबट्यांच्या भीतीचे नवे संकट

 

एकीकडे पावसाअभावी पिकांचे नुकसान दुसरीकडे शेतीमालाला अपेक्षित उत्पन्न नाही शेतमजुरांच्या हाताला पुरेसे काम मिळत नसताना उरलेली शेतीकामे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून शिवारात जावे लागत आहे मका सोंगणी, जनावरांसाठी चारा गोळा करणे रात्री पिकांना पाणी देणे अशा कामांसाठी शेतात जाणे अपरिहार्य आहे मात्र आता बिबट्यांच्या वावरामुळे दिवसा शेतात जाणेही धोक्याचे वाटू लागले आहे दुष्काळाने आर्थिक कंबरडे मोडले असतानाच वन्यप्राण्यांच्या भीतीने शेतीकामांवरही संकट निर्माण झाले आहे

 

वन विभागाकडून पिंजरा लावला

 

घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी तुषार देसाई वनरक्षक विशाल बलसाने वाहनचालक गणेश चव्हाण वनसेवक मच्छिंद्र आरखडे अंबादास मोरे व प्रकाश खैरनार यांनी घटनास्थळी पाहणी केली बिबट्यांच्या हालचालींचे चित्रीकरण करण्यात आले असून त्यांच्या वावरावर लक्ष ठेवण्यासाठी संबंधित शिवारात पिंजरा लावण्यात आला आहे

शेतकऱ्यांना दुहेरी संकटातून दिलासा कधी

 

पूर्व भागातील शेतकरी यंदा दुष्काळ आर्थिक अडचणी आणि शेतीमालाच्या नुकसानीशी झुंज देत आहे त्यात आता बिबट्यांच्या वावरामुळे शेतात काम करण्यासाठी मजूर मिळणेही अवघड होण्याची शक्यता आहे वन विभागाने केवळ पिंजरा लावण्यापुरती कार्यवाही न ठेवता नियमित गस्त बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे

वन विभागाने नागरिकांना एकट्याने शेतात न जाणे लहान मुलांना शेतशिवारात एकटे न पाठवणे रात्री विशेष खबरदारी घेणे तसेच बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा हुसकावण्याचा प्रयत्न न करता तातडीने वन विभागाला माहिती देण्याचे आवाहन केले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 4 6 7 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे