Breaking
क्रिडा व मनोरंजन

लासलगाव च्या कृतिकाची उत्तुंग भरारी

1 3 1 8 4 8

न्यायभूमी 

लासलगाव दिनांक २८ ऑक्टोंबर कैलास उपाध्ये 

नॅशनल ग्रॅपलिंग(कुस्ती) चॅम्पियनशिप 2026, वंदना कटारिया स्टेडियम,हरिद्वार उत्तराखंड येथे 24 ते 26 ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या स्पर्धेमध्ये 38 ते 42 किलो वजन गटामध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करणारी कु.कृतिका भाग्यश्री जितेंद्र पाटील. हिने अतिशय दैदीप्यमान कामगिरी करून सुवर्णपदक पटकावले.

तिने खेळलेली वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी:- तिचा 34 ते 38 किलो वजन गट असताना शेवटच्या क्षणी तिचे वजन 38.900 भरल्यामुळे तिला पुढच्या गटामध्ये म्हणजे 38 ते 42 किलो गटामध्ये खेळावे लागले.

पहिल्या राउंड मध्ये पश्चिम बंगाल व दुसरा राउंड हिमाचल प्रदेश सोबत सामना करताना तिने विजय प्राप्त केला.शेवटची स्पर्धा हरियाणा सोबत अतिशय चुरशीची झाली.मिळालेल्या पॉईंट्स च्या जोरावर तिने विजयश्री खेचून आणला व सुवर्णपदक पटकावले.विशेष म्हणजे तिन्ही राज्यांसोबत खेळताना प्रतिस्पर्धी मुलींचे वजन 40+ होते.

सुवर्णपदक मिळवून तिची निवड नेपाळ येथे होणाऱ्या आशियाई ग्रॅपलिंग(कुस्ती) स्पर्धा 2026 मध्ये झाली ज्यात ती भारताचे प्रतिनिधित्व करेल.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 1 8 4 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे