लासलगाव येथील ॲक्सिस बँक शाखेतील खात्याचा वापर करून तब्बल २५ लाखांची सायबर फसवणूक
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
नाशिक जिल्हा दि.१६ जुलै कैलास उपाध्ये
लासलगाव येथील ॲक्सिस बँकेच्या शाखेतील एका खात्याचा वापर करून विविध तक्रारदारांची तब्बल २४ लाख ९० हजार रुपयांची सायबर फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित खातेदाराविरोधात सायबर पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण येथे कार्यरत महिला पोलीस शिपाई मेघा निलेश कातकाडे, वय ३०,रा.सुदर्शन प्राईम, दत्तनगर, कोणार्क नगर-२, आडगाव, नाशिक यांनी फिर्याद दिली आहे.
दि.२० जानेवारी २०२६ रोजी लासलगाव येथील ॲक्सिस बँक शाखेत संबंधित आरोपीने संदर्भ क्रमांक ३१९०४२६००७४४१४ व ३१६०२२६००२०७१४ मधील तसेच इतर तक्रारदारांना फसवून त्यांच्याकडील रक्कम स्वतःच्या ॲक्सिस बँकेच्या ९२५०२००५३७४८८०३ या खात्यात वळवली.
त्यानंतर ती रक्कम स्वतःच्या अथवा इतर साथीदारांच्या आर्थिक फायद्यासाठी धनादेशाद्वारे काढून एकूण २४ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी ॲक्सिस बँकेच्या सदर खाते धारकाविरुद्ध दि.१४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.३१ वाजता स्टे.डा.नोंद क्र. ०४/२०२६ वरून गु.र.नं.१५/२०२६ अन्वये भा.न्या.सं.कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(सी) व ६६(डी) अंतर्गत ठकबाजी व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, सायबर पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण हे करीत आहेत.


