महाराष्ट्र
जळगाव जिल्ह्यातील वाहतूक पोलिसाचा लाच घेतानाचा प्रकार समोर! व्हिडीओ व्हायरल
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
0
9
5
3
0
3
न्यायभूमी न्यूज
जळगाव जिल्हा दि ०२ एप्रिल विशेष प्रतिनिधी
जळगावच्या पाचोरा येथील एका वाहतूक पोलिसाचा ट्रक चालकाकडून पैसे घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
या प्रकरणामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
व्हिडिओमध्ये ट्रकच्या केबिनमध्ये बसलेल्या चालकाकडून वाहतूक पोलिस कर्मचारी पैसे घेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
हा कर्मचारी पाचोरा पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून पुढील कारवाई काय होते.
याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सदर वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांची निलंबन व्हावे असे वाहतूक संघटना कडून होत आहे.
0
9
5
3
0
3



