बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातून जामनेर तालुक्यातील विद्यालयानी धडा घ्यावा – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचे शाळांना निवेदन
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
जामनेर दि २४ ऑगस्ट
दिनांक 23 ऑगस्ट रोजी , मा राजसाहेब ठाकरे व अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये व जळगाव जिल्हा अध्यक्ष ॲड जमील देशपांडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तथा जामनेर पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी अधिकारी यांचे नामे गट शिक्षण विस्तार अधिकारी काळे साहेब यांना निवेदन देवून “बदलापूर” येथील अल्पवयीन मुलीवरील अमानुष अत्याचार प्रकरणी तालुक्यात शासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या जी आर नुसार प्रत्येक विद्यालयात विद्यार्थी व विशेष मुलींची सुरक्षा व काळजी घ्यावी , सी सी टी व्ही , सफाई कर्मचारी, मुलीना ने आण करणाऱ्या स्कूल बसेस याबाबत नोंद घ्यावी याबाबत जामनेर न्यू इंग्लिश स्कूल , इंदिराबाई प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, एकलव्य प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक यांना मनसे चे वतीने जामनेर मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी निवेदन सादर केले आहे.
महिन्याभरात विद्यालय यांच्याकडून निवेदनावर काय दक्षता घेतली याची चौकशी व पाहणी करण्यात येणार असल्याचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी दिला आहे.