Breaking
महाराष्ट्र

डॉ.यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाले अंतर्गत ‘आयुष्य सुंदर आहे’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 5

न्यायभूमी न्यूज महाराष्ट्र 

लासलगाव दि.१७ जानेवारी सुनील पोळ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,लासलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाले अंतर्गत ‘आयुष्य सुंदर आहे’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. हेमंत टिळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आपल्या व्याख्यानात श्री.टिळे यांनी आयुष्य अधिक सुंदर व अर्थपूर्ण कसे करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.

दैनंदिन जीवनात सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि छोट्या सवयींमधील बदल यांमुळे जीवनात मोठे बदल घडू शकतात,असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भुषण हिरे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून थोडे दूर राहून प्रत्यक्ष जीवन जगायला शिकावे, असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ.राजेश शंभरकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सृष्टी थोरात यांनी केले.

कार्यक्रमास प्रा.संदीप ठाकरे,प्रा.अनिता चव्हाण, प्रा.पूनम अहेर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी आदरणीय गोविंदरावजी होळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे