जामनेर तालुक्यातील शिक्षकांना बी.एल.ओ पदावरून मुक्त करा – मनसे विद्यार्थी सेनेची मागणी
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
जामनेर दि.१७ जुलै
16 जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे वतीने जामनेर तहसीलदार साहेब तथा निवडणूक अधिकारी यांना जामनेर तालुक्यातील शिक्षकांना बी एल ओ पदावरून मुक्त करावे.
यासाठी मनसे विद्यार्थी सेनेचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष कल्पेश भाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली जामनेर तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी निवेदन दिले.
जामनेर तालुक्यातील शिक्षक यांना शाळेवर वेळ देता यावा व विद्यार्थी यांच्या अध्यापनावर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी गावातील ग्रामसेवक तथा तलाठी यांची नियुक्ती करण्यात यावी जेणेकरून शिक्षक पूर्ण वेळ शाळेला देऊ शकतील.
गावातील प्रत्येक मतदार यांची ग्रामसेवक व तलाठी यांना जवळून ओळख असते.त्यामुळे s i r ड्यूटी योग्य पद्धतीने हाताळता येऊ शकते. अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आले.
यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे रावेर लोकसभा मतदार संघाचे जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार,मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील,मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष आशुतोष पाटील,मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, मनसे पहूर अध्यक्ष रतन देशमुख,ता.उपाध्यक्ष वाल्मीक कोळी,ता.सरचिटणीस रामेश्वर भोसले, परशुराम चिखली कर,सतीश विजय पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.


