Breaking
गुन्हेगारी

चेन स्नॅचिंग करणारी सराईत टोळी जेरबंद

दहा गुन्हे उघड ४.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त

0 9 9 0 2 1

न्यायभूमी 

 नासिक दि.३० जून कैलास उपाध्ये जिल्हा प्रतिनिधी 

नाशिक ग्रामीण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पसार होणाऱ्या चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.

या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने निफाड परिसरात राबविलेल्या धाडसी कारवाईत सराईत चेन स्नॅचिंग टोळीला जेरबंद करत जिल्ह्यातील तब्बल दहा गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळविले आहे.

     पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चेन स्नॅचिंग प्रवण भागात गस्त,नाकाबंदी व विशेष तपास मोहीम सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे निफाड चौफुली परिसरात सिनेस्टाईल पाठलाग करून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केल्यानंतर आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विशाल पोपट सांगळे (रा.सातपूर, नाशिक),गणेश ऊर्फ कुलदीप मनोहर कापसे (रा.पेठ रोड,नाशिक), रोहित केशव गायकवाड (रा.भाऊनगर, पिंपळगाव बसवंत) आणि विनय पांडुरंग उज्जैनकर (रा.अश्वमेध नगर,नाशिक) यांचा समावेश आहे.

        चौकशीत आरोपींनी सायखेडा,निफाड, दिंडोरी,पिंपळगाव बसवंत,ओझर,वावी आणि लासलगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महिलांचे सोन्याचे दागिने जबरीने हिसकावल्याची कबुली दिली. या टोळीने चोरी केलेले दागिने विनय उज्जैनकर याला विकल्याचेही निष्पन्न झाले.

या कारवाईत पोलिसांनी ४८ ग्रॅम सोन्याची लगड, गुन्ह्यात वापरलेली यामाहा एफ झेड -एस मोटारसायकल, मोबाईल फोन असा एकूण ४ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.उर्वरित चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी तपास सुरू आहे.

तपासा दरम्यान सायखेडा,निफाड,दिंडोरी, पिंपळगाव बसवंत,ओझर,वावी आणि लासलगाव पोलीस ठाण्यांतील एकूण दहा चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोपींवर यापूर्वी जबरी चोरी,घरफोडी,चोरी, प्राणघातक हल्ला,खंडणी,दुखापत व फसवणूक यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.तसेच विशाल सांगळे हा सातपूर पोलीस ठाण्यातील एका गंभीर गुन्ह्यात फरार असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

        स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील चेन स्नॅचिंगच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असून,आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 9 0 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे