Breaking
महाराष्ट्र

लासलगाव येथील डम्पिंग ग्राउंड येथील कचरा जाळून उडालेल्या धुरामुळे नागरिकांचे जीव धोक्यात

1 3 5 7 5 1

न्यायभूमी 

 

 लासलगाव दिनांक १२ नोव्हेंबर कैलास उपाध्ये 

लासलगावमधील डम्पिंग ग्राउंडवर कचरा जाळल्याने पसरणाऱ्या धुराच्या लोटांमुळे स्थानिक नागरिक हैराण झाले असून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या समस्येमुळे परिसरातील हवेची गुणवत्ता खालावली असून नागरिकांकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

या डम्पिंग ग्राउंड जवळ शाळा व महाविद्यालय असल्याने संपूर्ण दिवस हे धुराचे लोट या परिसरात दिसत असल्याने विद्यार्थ्यांचे सुद्धा जीव धोक्यात निर्माण झाले आहे तरी शासनाने त्वरित या समस्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा ही लासलगावकरांची मागणी आहे.

• धुराचे साम्राज्य डम्पिंग ग्राउंडवर कचरा जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निर्माण होत आहेत. हा धूर आजूबाजूच्या नागरी वसाहतींमध्ये पसरत असल्याने रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.

• कचरा संकलनाची समस्या मर्यादित घंटागाड्या कार्यरत असल्याने कचरा उचलण्याची आणि व्यवस्थापनाची समस्या अधिकच बिकट झाली आहे.

• आरोग्याला धोका. कचरा जळाल्याने निघणारा विषारी धूर आणि दुर्गंधी यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवनदीच्या काठावरील या कचरा डेपोमुळे विद्यार्थी आणि नदीच्या आरोग्याला निर्माण झालेल्या धोक्याकडे लक्ष वेधले होते.

• प्रशासनाकडे मागणी.काही दिवसांपूर्वी डम्पिंग ग्राउंडची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती, परंतु कचरा जाळण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी लासलगावकरांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 5 7 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे