Breaking
महाराष्ट्र

प्रपंच व परमार्थ हे मानवी जीवनातील दोन अंगे

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 0 0 0 1

न्यायभूमी 

विचूर दि.११ फेब्रुवारी मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर 

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षणाबरोबरच अध्यात्माला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून परमेश्वराने दिलेल्या सुंदर नरदेहाचा सत्कर्मासाठी सदुपयोग व्हावा या दृष्टिकोनातून आपल्यात असलेल्या कलागुणांना वाव मिळणे गरजेचे आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रपंच आणि परमार्थ या दोन गोष्टी येत असतात.प्रपंच हा होत असतो तर परमार्थ आपल्याला करावा लागतो म्हणूनच प्रपंच व परमार्थही मानवी जीवनातील दोन अंगे आहेत. 

आपल्या भारतभूमीला संतांची भूमी म्हटले जाते.संतांच्या आचरण संतांच्या आचारण विचार मानवी संत कोणाला म्हणावे? समाधान शोधताना दुसऱ्याच्या आनंदाला ठेच लागणार नाही याची परिपक्क जाणीव,नम्रता,संयम सदा चार देवाचरणी होण्याची ताकत ज्यांच्याकडे आहे ते संत विश्वमाऊली ज्ञानेश्वर महार-ाज, जगदुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज,संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सह सर्व संतांनी मानवी अवत रातही ही भूमी देवभूमी केली.साक्षात पंढरीच्या विठ्ठलाला भक्तांसाठी प्रकट व्हावे लागले.

कर्म,भक्ती आणि ज्ञान यांचा समन्वय साधल्याने माणसाला आत्मसाक्षात्कार होतो व त्याला संपूर्ण समाधान लाभून ते कायम टिकते.

हेच परमार्थाचे साधन असल्याने नेहमी त्याचे श्रवण करावे. कर्म, भक्ती, ज्ञान व ध्यान यांचा सुरेख संगम व्यवहारातही उपयुक्त ठरतो.

तर मग परमार्थात तो आवश्यक ठरेल यात नवल ते काय ? कर्म,ज्ञान,ध्यान आणि भक्ती यांचा सुरेख संगम झाला की जीवन कृतार्थ होते.प्रपंच आणि परमार्थ ही मानवी जीवनाचे दोन अंगे आहेत.

रामभाऊ आवारे

प्रदेश प्रसिद्धीप्रमुख वारकरी मंच महाराष्ट्र राज्य

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे