
न्यायभूमी
लासलगाव प्रतिनिधी दि.२३ जुलै कैलास उपाध्ये
राजधानी दिल्लीत ‘NEET’ पेपरफुटीविरोधात आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सीजेपीच्या (CJP) आंदोलनाला नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथून मोठा प्रतिसाद व पाठिंबा मिळाला आहे.
विद्यार्थ्यांवर दिल्लीत झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. लासलगाव येथे काळया फिती घालून मोदी तेरी तनाशाही नही चलेगी नही चलेगी अशा घोषणा देत लासलगाव येथे काँग्रेस आणि इतर पक्षांनीही आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे.
लासलगाव विद्यार्थी संघटना तसेच आंबेडकरी विचार असणारी जनता भारतीय संविधान ला मानणारे यांनी आंदोलनाला विशेष प्रतिसाद दिला.
येवला, लासलगाव आणि इतर शहरांमध्ये कार्यकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या विरोधात निषेध नोंदवला. तसेच, विद्यार्थ्यांचा आवाज दडपला जाऊ नये अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे.
दरम्यान लासलगाव येथील एसटी बस डेपो येथून मोर्चा काढण्यात आला व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तनाशाही नही चालणार मोठ्या प्रमाणात महिला व विद्यार्थी यांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यात आला आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लासलगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



