Breaking
आरोग्य व शिक्षण

एस एन अभियांत्रिकी महाविद्यालयात “निर्भय कन्या अभियान ” संपन्न

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 1 5 5 9 7

न्यायभूमी न्यूज

येवला दि १८ ऑक्टोंबर पुष्पा पाटील 

एस एन डी अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्राच्या विद्यार्थिनीसाठी निर्भय कन्या अभियाना अंतर्गत आरोग्य जनजागृती कार्यशाळा संपन्न झाली.

यावेळी प्रमुखपाहुणी म्हणून डॉ कविता दराडे उपस्थित होते . यावेळी सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी २०० हून अधिक विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला

नि डॉ कविता दराडे म्हणाल्या कि शारीरिक व मानसिक आरोग्यच्या सुरक्षेसाठी किशोरवयीन मुलींना योग्य मार्गदर्शन गरजेचे आहे .जर योग्य काळजी घेतली तर शारीरिक मानसिक बदल , योग्य आहार आरोग्याशी निगडित समस्या उध्दभवणार नाहीत.

निरोगी अन्न खाणे आफळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि पाणी पिण्यामुळे तुमचे शरीर आनंदी राहण्यास मदत होतेकिशोरवयीन काळात, भावनिक आणि मानसिक आरोग्य स्त्रीरोग आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते

यावेळी बोलताना प्राचार्य डॉ डी . एम यादव म्हणाले कि विद्यार्थिनींनी निर्भय होण्यासाठी सकारात्मक विचार अंगिकारून विकास साधावा.

सध्याचा काळ मुलींच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण आहे निर्भय कन्या अभियान राबविणारे पुणे विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ असून मुलींमध्ये धैर्य आणि हिंमत निर्मितीसाठी सदर योजना राबविण्यात येत असल्याची माहिती दिली.

प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ विद्या निकम , विध्यार्थी विकास अधिकारी प्रा संदिप कराळे , शैक्षणिक अधिष्ठाता प्रा संदीप येवले महिला प्राध्यापक उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. संघमित्रा कांबळे यांनी आभार मानले.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 5 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे