Breaking
महाराष्ट्र

बाभुळगाव ता.येवला येथील एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत महिला सबलीकरण व सक्षमीकरण ही एकदिवसीय कार्यशाळा

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 5

न्यायभूमी न्यूज 

येवला दि २४ जुलै अभय पाटील 

बाभुळगाव ता येवला येथील एस.एन.डी. अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत महिला सबलीकरण व सक्षमीकरण ही एकदिवसीय कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.

या कार्यशाळेचे उदघाटन श्रीमती अंकिता बावीस्कर ( पोलीस उपनिरीक्षक,येवला शहर ) व डॉ.निखिता मोहिते (वैद्यकीय अधिकारी पाटोदा ग्रामीण रुग्णालय तालुका येवला ) यांनी केले.

सदर कार्यशाळच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी.एम यादव होते.160 हुन अधिक मुली व महिला प्राध्यापक उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची प्रस्थापना डॉ गिरिशा बोंबले यांनी कार्यक्रमाची प्रस्थावना दिली.

कार्यशाळा समन्वयक डॉ विद्या निकम होत्या.

श्रीमती अंकीता बावीस्कर मुलींना मार्गदर्शन करताना म्हणाल्या कि मुलींमध्ये आत्मविश्वास आणि लढाईची वृत्ती विकसित करणे.

मुलींना स्वतःचा बचाव करण्याचे प्रशिक्षण घेतले पाहिजे.महिलांच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे,जसे की,‘जी.पी.एस्. ट्रॅकिंग’,सुरक्षा ‘ॲप्स’आणि ‘क्लोज सर्किट टीव्ही कॅमेरे.’यांचा वार झाला पाहिजे .

 यावेळी बोलताना डॉ निखिता मोहिते म्हणाल्या कि मुलींना आरोग्य विषयक माहिती स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी.

स्वतःचे आरोग्य कसे सदृढ ठेवावे मुलींमध्ये शारीरिक आणि भावनिक बदल होत असताना,त्यांच्या स्त्री रोगविषयक आरोग्याला समजून घेणे आणि त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.

प्राचार्य डॉ.यादव म्हणाले कि महाविद्यालय मुलींची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अनेक उपाय योजना राबवत आहे.

यावेळी सर्व विभागप्रमुख,सर्व महिला प्राध्यापक व रजिस्ट्रार डॉ.दत्तात्रय क्षीरसागर उपस्थित होते.

डॉ विद्या निकम यांनी सर्वांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे