Breaking
महाराष्ट्र

मध्यस्थ विषयावर कायदे विषयक जनजागृती शिबिरात मार्गदर्शन करताना न्यायाधीश डॉ.विक्रम अंबादास आव्हाड

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील

1 1 9 1 7 7

न्यायभूमी 

मेढा,दि.०५ जुलै २०२६ 

Mediation (मध्यस्थ) प्रक्रिया बाबत दिवाणी व फौजदारी न्यायालय,मेढा येथे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.

मा. सर्वोच्च न्यायालय दिल्ली,मा.उच्च न्यायालय, मुंबई तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशानुसार जावली तालुका विधी सेवा समिती, जावली तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

कार्यक्रमास जावली तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी व फौजदारी न्यायालय, मेढा येथील न्यायाधीश मा.डॉ.विक्रम अं.आव्हाड यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी जावली तालुका वकील संघाचे अध्यक्ष श्री.आर.एस.पोफळे, जावली तालुका वकील संघाचे उपाध्यक्ष श्री.व्ही.बी.विधाते,श्री व्ही. जी.महाडिक,सहा.सरकारी अधिवक्ता श्री. श्रीनिवास कणसे,श्रीमती एन.एस.पवार,श्रीमती व्ही व्ही गाढवे,श्रीमती ए आर पवार, न्यायालयीन कर्मचारी तसेच पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशिक्षित मध्यस्थ श्री व्ही. जी.महाडिक यांनी Mediation Process (मध्यस्थ प्रक्रिया) चे महत्त्व विशद केले.त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत विविध उदाहरणे दिली.

प्रशिक्षित मध्यस्थ श्री.व्ही.बी.विधाते यांनी देखील न्यायालयातील मध्यस्थ व त्यांची भूमिका याबद्दल मार्गदर्शन केले.

प्रशिक्षित मध्यस्थ श्री आर एस पोफळे यांनी देखील न्यायालयातील प्रकरणे संपोचाराने मिटवण्यासाठी मध्यस्थांची भूमिका व मध्यस्थ कडून केलेली जाणारी योग्य अंमलबजावणी या विषयावर मार्गदर्शन केले.

 

यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना न्यायाधीश मा.डॉ.विक्रम अंबादास आव्हाड यांनी मध्यस्थ विषयावर बोलताना प्रशिक्षित मध्यस्थ आणि न्यायालय यांच्या भूमिके विषयी मार्गदर्शन केले.

आपली न्यायालयातील प्रकरणे मिटवण्यासाठी प्रशिक्षित मध्यस्थ यांची भूमिका खुप महत्वाची आहे आणि त्याचा फायदा पक्षकारांनी घेतला पाहिजे.

तसेच कोण कोणती प्रकरणे मध्यस्थ यांच्या मार्फत मिटू शकतात याची देखील माहिती देण्यात आली. आपल्या प्रकरणांचा लवकर निपटारा करण्यासाठी मध्यस्थ हे उत्तम माध्यम असे सांगितले

 

सदरील कायदेविषयक जनजागृती शिबिराचे सुत्र संचालन जावली तालुका वकील संघाच्या सदस्या श्रीमती एन एस पवार यांनी तर आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपीक श्री संभाजी पालखे यांनी केले.

त्यांनी उपस्थिताचे आभार मानले,शेवटी मध्यस्थ प्रक्रियेची शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 9 1 7 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे