Breaking
आरोग्य व शिक्षण

देव’-देश- संत व धर्माबरोबरच जनसेवेची भक्ती करा!- ज्येष्ठ संत नरेश गंगवार

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 4

न्यायभूमी 

येवला दि. १० जानेवारी पुष्पा पाटील

रामायणामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांनी शबरी मातेला उपदेशपर शब्द सांगितले होते,ते सर्वांसाठी शबरीच्या माध्यमातून दिले ते असे होते की देव- देश- धर्म संत यांच्या बरोबरच जनसेवेची भक्ती करा ! असा उपक्रम बाबा डमाळे पाटील यांच्या माध्यमातून मधून मोफत नेत्र तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया शिबिर हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन उत्तर प्रदेश येथील महान व त्यागी संत प्रा.नरेश गंगवार यांनी अंदरसुल येथे केले आहे.

             बाबा डमाळे पाटील यांच्या वतीने विविध सामाजिक,धार्मिक, सांस्कृतिक,लोक उपयुक्त विविध कार्यक्रम सतत येवला- लासलगाव विधानसभा मतदारसंघात चालू असतात,त्यापैकी दहा वर्षापासून नेत्ररोग मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर हे चालू असते,या वर्षाच्या पहिल्या टप्प्याचा शिबिराचा समारोप आंदरसुल पूर्व भागात संत नरेश गंगवार ज्येष्ठ, ज्येष्ठ नेते बाबा डमाळे पाटील,पत्रकार प्रकाशराव साबरे,युवा नेते दिपकराव जगताप,माजी सभापती नम्रता जगताप यांच्या सह अन्य मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.

       दुसरा टप्पा येवला तालुक्यातील उंदीरवाडी येथून सुरुवात होणार आहे.पहिल्या टप्प्यात रस्ते सुरेगाव येथून शिबिराची सुरुवात झाली होती.

खामगाव, दुगलगांव,देवळणे,बोकटे,अंदरसुल जय हिंदवाडी,ढोले वस्ती,अंदरसुल गाव, जगतापवाडी अंदरसुल आदी ठिकाणी सुमारे १३५९लोकांनी नेत्र तपासणी करून घेतली.

त्यापैकी २४७ रुग्ण नेत्र शस्त्रक्रिया साठी पात्र झाली या सर्वांना पुणे येथे देसाई हॉस्पिटल हडपसर येथे मोफत लेन्स शस्त्रक्रिया,जेवण, राहण्याची,जाण्या- येण्याची लक्झरी व्यवस्था बाबा डमाळे पाटील मित्र मंडळातर्फे मोफत केली जाते. 

    दहा वर्षापासून चाललेल्या या उपक्रमामध्ये लाखो नेत्र रुग्णांनी आपल्या मोफत नेत्र तपासण्या करून घेऊन सुमारे सहा हजार लोकांनी मोफत शस्त्रक्रिया करून घेतलेल्या आहेत.

      या विविध कार्यक्रम करिता पत्रकार प्रकाश साबळे,दिपकराव जगताप,सरपंच मोहिनी आहेर,उपसरपंच भिमाबाई भागवत, विकास संस्था चेअरमन बारकू मगर,नाना शेळके,पाऊलस अहिरे,सरपंच रावसाहेब लासुरे,भाजपा तालुका जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब देशमुख, शिवाजीराव वडाळकर, भाजपा तालुकाअध्यक्ष महेश देशमुख,भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष वृषाल डमाळे, रोहन डमाळे,सरपंच संजय ढोले,माजी पंचायत समिती सभापती नम्रता जगताप,जितेंद्र जहागीरदार, छगनबाबा मगर,देविदास चव्हाण,कचरू चव्हाण,सरपंच सागर हरिश्चंद्रे,सरपंच रावसाहेब लासुरे,सखाहरी लासुरे,ज्येष्ठ नेते सिताराम दादा दाभाडे,अण्णासाहेब ढोले,सरपंच प्रताप दाभाडे,शिवनाथ संत,बाबासाहेब ढमाले,संदीप वाघ,अशोक घोडेराव,दत्तात्रेय सोळशे,गणेश कोटमे,रतन कोटमे,संतोष कोटमे,योगेश काळे, मनोज दाभाडे,मनोज कापसे यांच्यासह मोठ्या संख्येने नेत्र रुग्ण आजी-माजी प्रतिष्ठित पदाधिकारी उपस्थित होते,आभार शरद जगताप यांनी केले.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे