आषाढी एकादशी निमित्त विधिवत महापूजा श्रीराम मंदिर लासलगाव येथे संपन्न
न्यायभूमी
लासलगाव दि.२७ जुलै निशिकांत पानसरे

आषाढी एकादशीच्या पावन परवा निमित्त शनिवार दिनांक २५/७/२६ रोजी श्रीराम मंदिर लासलगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणीची विधिवत पूजा श्री ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते भक्तिमय वातावरण संपन्न झाली.
पहाटे काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमास सुरुवात झाली.त्यानंतर वैदिक मंत्र उच्चारणे श्री विठ्ठल व माता रुक्मिणी यांचा अभिषेक पंचामृत स्नान अलंकार पूजन व महाआरती करण्यात आली.
यावेळी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती .भाविकांनी,,” विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल “या नामघोष सहभागी होत दर्शनाचा लाभ घेतला.
दिवसभर भजन कीर्तन हरिपाठ आणि नामस्मरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
तसेच महा आरतीनंतर भाविकांना प्रसाद म्हणून साबुदाणा खिचडी व केळीचे वाटप करण्यात आले.
आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा उत्सव असून भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी गावातील व परिसरातील भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते.
धार्मिक उत्साह भक्ती भाव आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडवणारा हा सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला.
आषाढी एकादशीनिमित्त आयोजित कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री अशोक नाना होळकर, डॉक्टर कैलास पाटील ,डॉक्टर युवराज पाटील ,भरत पाटील, सुरेश वडनेरे ,सौरभ पाटील, विष्णू निकम ,कवी प्रकाश होळकर, नानासाहेब पाटील तसेच ज्येष्ठ नागरिक संघ लासलगावचे सदस्य श्री सी एस पाटील, अरविंद देसाई, एकनाथ थोरात तसेच भाविक भक्त गौरव कहाने,अमोल पाटील, धनंजय मुंदडा ,सुदर्शन वाकचौरे, निलेश जगताप, अक्षय खापरे श्री व सौ वाघ ,मधुकर गावडे, साहेबराव वाकचौरे ,शिवाजी मोरे, अशोक अग्निहोत्री, नंदू भंडारी, मयूर भंडारी, जितू गुरव उपस्थित होते.


