ओझरला मराठा उद्योजक चर्चासत्र, दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
ओझर दि २३ डिसेंबर प्रतिनिधी उत्तम गारे
ओझर येथील मराठा सेवासंघ प्रणित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या वतीने माधवराव बोरस्ते विद्यालयात चर्चासत्र तसेच दिनदर्शिका प्रकाशन सोहळाचे आयोजन करण्यात आले.
प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रास्ताविक रवी शिंदे यांनी केले.
व्यासपीठावर मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीनजी ठाकरे, सदस्य रमेश पिंगळे ॲड लक्ष्मण लांडगे सह्याद्री इंडस्ट्रीजचे संचालक विलास शिंदे,अनिल कदम, राजू देसले, यतीन कदम, डॉ संजय शिंदे,उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांना बोरस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे लिखित ‘शिवचरित्र’ ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उद्योजक दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. शिवव्याख्याते नितीन डांगे पाटील, अनिल कदम, डॉ प्रशांत पाटील, विभागीय प्रमुख राजू देसले यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यालयाच्या गॅलरीत प्रक्रिया केलेल्या उत्पादनांचे स्टॉल लावण्यात आले होते. उद्योग व्यवसाय करताना जिद्द चिकाटी व परिश्रम घेण्याची तयारी असेल तर व्यवसायात यश निश्चित मिळते असे मविप्र सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांनी उपस्थितांना आवाहन केले.
रवी शिंदे, ज्ञानेश्वर पुंड यांनी चर्चा सत्राचे आयोजन केले. मेळावा यशस्वीतेसाठी बोरस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी सर्व व्यवस्था उपलब्ध करून दिली.
चर्चासत्रास परिसरातील बहुसंख्य पुरुष महिला उद्योजक उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपक भदाने स्मिता आहेर यांनी केले.