सटाण्यात पोलिस वर्धापन दिनानिमित्ताने पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
सटाणा- दि ०३ जानेवारी
कालकथित पॅंथर प्र. र. बच्छाव सामाजिक संस्था तसेच वंचित बहुजन आघाडी, बागलाण तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनाच्या निमित्ताने येथील पोलिस ठाण्यात पोलिसाप्रती कृतज्ञता व आदर व्यक्त करण्यासाठी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार हॆ होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र बच्छाव यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी रात्रंदिवस काम करणारे, 24 तास कर्तव्यावर राहणारे, तसेच प्रसंगी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिस बांधवांच्या प्रति कृतज्ञता व आदर व्यक्त करण्यासाठी संस्थेतर्फे हा अभिनव उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे बागलाण तालुका अध्यक्ष शेखर बच्छाव, महासचिव दादा खरे, जिल्हा संघटक सुनील जगताप व दीपक बच्छाव, निलेश शिरसाठ,पंकज खरे, शेवाळे सर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व पोलिस कर्मचाऱ्यांचा आदरपूर्वक सन्मान व सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी माझ्या 32 वर्षाच्या सेवा कालखंडात प्रथमच असा कार्यक्रम पाहिला असल्याचे सांगून माझ्या सह सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमामुळे प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय राऊत यांनी अशा कार्यक्रमांमुळे नक्कीच जनमानसात व समाजात पोलिसांची प्रतिमा उंचावण्यास मदत होईल.
त्याचबरोबर पोलिस हा समाजाचा शत्रू नसून मित्र आहे ही भावना अधिक प्रबळ होणार असल्याचे सांगितले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव दादा खरे यांनी पोलिस व सामान्य जनता यांच्यात विश्वासाचे व मैत्रीचे नाते निर्माण करणे हाच कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले.
याप्रसंगी वंचितचे तालुका अध्यक्ष शेखर बच्छाव तसेच दीपक बच्छाव यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर सदर कार्यक्रमाचे आभार सुनील जगताप यांनी मानले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय राऊत, हेड कॉन्स्टेबल रायसिंग जाधव, योगेंद्र शिसोदे, मधुकर तारू,योगेश शेवाळे, अजित देवरे, पोलीस नाईक विशाल जाधव, नितीन जगताप, गणेश गरुड, गणेश सोनवणे, योगेश साळुंखे, दिलीप गायकवाड, योगेश पवार, कैलास घरटे आदीसह सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.