ओझरच्या बोरस्ते विद्यालयाला विज्ञान प्रदर्शनात उत्तेजनार्थ पारितोषिक…
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
ओझर: दि.३१ प्रतिनिधी / उत्तम गारे
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात येथील ‘मविप्र’ संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयाचे प्रयोगशाळा सहाय्यक राजेंद्र बागले यांच्या उपकरणाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. विंचूर येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात स्प्रे ब्लोअर हे उपकरण मांडण्यात आले होते.
याप्रसंगी उपकरणाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या उपकरणाचा हेतू स्पष्ट करताना, भविष्यात शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणारे स्प्रे ब्लोअर यंत्रामुळे शेतीत मजुराअभावी वेळेची व पैशांची बचत होतेच शिवाय ह्या स्प्रेमुळे कमी वेळेत जास्त जमीनक्षेत्र औषध फवारण्याचे काम करू शकते. कीटकनाशक, तणनाशक, पोषक अशा प्रकारची औषधे या यंत्राने फवारली जाऊ शकतात अशी माहिती प्रयोगशाळा सहाय्यक राजेंद्र बागले यांनी सत्कार प्रसंगी विद्यार्थ्यांना दिली.
या यशाबद्दल मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्या हस्ते राजेंद्र बागलेंना पुष्पगुच्छ प्रमाणपत्र पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच दहावीच्या सहभागी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक नरेंद्र डेरले यांनी केले.