रयतची विंचूर कन्या चमकली राष्ट्रीय स्तरावर कु.पल्लवी सोमनाथ निकम हिच्या कामगिरीने नाशिकचा मान उंचावला !
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील

न्यायभूमी विंचूर दि.११ सप्टेंबर २०२६
मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या टेनिस बॉल क्रिकेट असोशिएशन ऑफ इंडिया व टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन (गोवा ) , ऑल इंडिया इंटरनॅशनल टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप मनोहर पर्रीकर स्टेडियम मडगाव (गोवा) येथे झालेल्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर ऑल इंडिया इंटरनॅशनल चॅम्पियनशिप मध्ये ‘ तृतीय ‘ स्थान पटकाविले.
या यशामध्ये नाशिकच्या निफाड तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विंचूर येथील ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु. पल्लवी सोमनाथ निकम हिनेअष्टपैलू कामगिरी करीत विशेष छाप पाडली.
या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने उत्तम कामगिरी करीत साखळी फेरीतून उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आणि राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक मिळविला.
महाराष्ट्राच्या संघातील अष्टपैलू खेळाडू म्हणून कु.पल्लवी निकम हिने फलंदाजी , गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात उल्लेखनीय कामगिरी केली.
तिच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी खेळामुळे संघाला अनेक वेळा निर्णायक क्षणी यश मिळाले . पल्लवीच्या या यशामुळे विंचूर सह निफाड तालुका आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा गौरव सातत्याने वाढत आहे.
कु . पल्लवीच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन आदरणीय भगीरथ काका शिंदे , रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य श्री राजेंद्र चांदे ,जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ, उत्तर विभागाचे सल्लागार समिती सदस्य सुनील भाऊ मालपाणी , स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष जगदीश जेऊघाले , उपाध्यक्ष कैलास शेठ सोनवणे , व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गोरे, उपाध्यक्ष सोमनाथ निकम गुरुकुल विभागाचे सदस्य दत्तात्रय दरेकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले . तसेच विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे , उपप्राचार्य वाबळे सर, लाईफ वर्कर रयत शिक्षण संस्था सातारा श्री ठाकरे सर, पर्यवेक्षक माळी सर, ज्युनिअर विभाग प्रमुख राजेंद्र टिळेकर , सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी , पालक, पत्रकार संघ आणि माजी विद्यार्थी संघटनांनीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे.
महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन , तसेच नाशिक जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सचिव मुकुंद झनकर यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रशिक्षक प्रदीप राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या संघाने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली.
पल्लवी निकमच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी नवी प्रेरणा निर्माण झाली असून तिच्या भविष्यातील उज्वल यशासाठी व वाटचालीसाठी सर्वत्र आशावाद व्यक्त केला जात आहे .