Breaking
महाराष्ट्र

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ विंचूर प्रेस क्लब तर्फे निवेदन..

संस्थापक अभय पाटील , मुख्यसंपादक _ दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 4

न्यायभूमी :     सुनील क्षिरसागर दि.२४,
विंचूर (नाशिक) : त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत विंचूर प्रेस क्लबच्या वतीने आज लासलगाव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

पत्रकार समाजातील चौथा स्तंभ मानला जातो. लोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकार सतत जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत असतात. मात्र असे असतानाही पत्रकारांवर हल्ल्याचे प्रकार वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर विंचूर प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांना निवेदन देताना पत्रकारांनी सांगितले की, पत्रकारांवर हल्ला हा लोकशाही व्यवस्थेवरील हल्ला असून यापुढे असे प्रकार घडल्यास पत्रकार संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल. प्रशासनाने हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कडक शिक्षा करावी,अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या प्रसंगी विंचूर प्रेस क्लबचे अध्यक्ष- सुनील क्षिरसागर, उपाध्यक्ष- राजेश भडांगे, सचिव – मच्छिंद्र साळुंके, सदस्य – जनार्दन चव्हाण, अभय पाटील, रोहन सरोदे, संदीप धनवटे, दत्तात्रय दरेकर तसेच इतर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
— —
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेला हल्ला हा अभिव्यक्त स्वातंत्र्याचा गळा घोटणारा प्रकार असून, तो कुठल्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे