डुबेरे येथील जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली स्वच्छता
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
सिन्नर दि ०२ ऑक्टोबर प्रतिनिधी:-
डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास वाजे होते.व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी महेश वारुंगसे,पोलीसपाटील रामदास वारुंगसे,जेष्ठ शिक्षक दिगंबर जाधव, सोमनाथ पगार,सोमनाथ गिरी,अरुण डावरे,विद्या ठाकरे , वरिष्ठ लिपिक राणी शिंदे,रोहिणी भगत आदी उपस्थित होते.
उपस्थितांच्या हस्ते महात्मा गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .स्वच्छता ही सेवा हा उपक्रम विद्यालयात उत्साहात राबविण्यात आला.स्वच्छता अभियानाचे उदघाटन मुख्याध्यापक वाजे व महेश वारुंगसे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच मुख्याध्यापक रामदास वाजे यांनी गांधी व शास्त्री यांच्या जीवन व कार्याची ओळ्ख करून देवून स्वच्छतेचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.स्काऊट-गाईडचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शालेय परिसराची स्वच्छता केली. सूत्रसंचालन शालेय सांस्कृतिक समितीचे प्रमुख पी.आर.करपे यांनी तर आभार सुनिल ससाणे यांनी मानले.
यावेळी कचेश्वर शिंदे, राजेंद्र गांगुर्डे,डी. ए. रबडे, जयश्री गोहाड, सविता खडांगळे,सुनिता ढोली,सीमा गोसावी, रेवणनाथ कांगणे ,सोमनाथ बोडके ,मारुती डगळे, किशोर शिंदे,रवि गोजरे, ज्ञानेश्वर कडभाने आदींसह शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.